Awaz24x7 News
क्रीडा उडी तंत्रज्ञान देश परदेशी मनोरंजन महाराष्ट्र राज्य व्यवसाय व्हिडिओ साहित्य

यवतमाळमधील नवदाम्पत्याला पंतप्रधानांनी पाठवले पत्र; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

हायलाइट्स:नवदाम्पत्याला पंतप्रधानांचे आशिर्वाद पत्रपत्र वाचून ढोरे कुटुंब गेले भारावूनपंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छायवतमाळ/प्रतिनिधीः यवतमाळ जिल्ह्यातील आर्णी येथील ढोरे कुटुंबात सध्या दुहेरी आनंदाचे वातावरण आहे. त्याचे झाले असे की, एडवोकेट राहुल ढोरे यांनी त्यांच्या लग्नाचे निमंत्रण देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Modi) यांना पाठवले होते. ढोरे यांनी पाठवलेल्या निमंत्रण पत्रिकेवर चक्क पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे उत्तर आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या नवदाम्पत्याला पत्राद्वारे शुभेच्छा पाठवत आशीर्वाददेखील दिले आहेत.ढोरे यांच्या पत्राला उत्तर देताना मोदींनी ढोरे कुटुंबाचे निमंत्रणाबद्दल आभार व्यक्त केले आणि वधू-वरांना शुभेच्छा आणि आशीर्वादही दिले आहेत. ढोरे कुटुंबियांना हे पत्र २२ डिसेंबर रोजी मिळाले असून तेव्हापासून त्यांचा आनंद गगनात मावत नाहीये. नरेंद्र मोदी यांनी पत्राच्या माध्यमातून ढोरे कुटुंबाला शुभेच्छा संदेश पाठवला आहे.

वाचाः रिक्षाचा धक्का लागला म्हणून तरूणांची चालकाला बेदम मारहाणएका छोट्याश्या गावातील एका तरुणाने आपल्या लग्नाची पत्रिका देशाच्या सर्वोच व्यक्तीला पाठवली आणि त्यांनी प्रतिसाद दिल्याने गावामध्ये देखील आनंदाचे वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून पत्राच्या माध्यमातून शुभेच्छा संदेश पाठविल्याने ढोरे परिवारातील सदस्यांनी आनंद व्यक्त केला आहे.

वाचाः पत्नीला मतदान करतानाचा फोटो व्हॉट्सअॅप स्टेटसवर ठेवला अन्…या आहेत पत्रामध्ये शुभेच्छाराहुल आणि मयुरी तुम्हाला लग्नाच्या खूप खूप शुभेच्छा विवाहाचे निमंत्रण मिळाल्याने मला आनंद झाला. नवजीवनात तुम्हाला सुखी आणि समृद्ध जीवनासाठी माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा असे त्यात मोदींनी म्हटलं आहे.

वाचाः ७४ वर्षांच्या वृद्धाचे संतापजनक कृत्य; बोरे वेचायला आलेल्या मुलीला घरात नेले अन्…

Related posts

थट्टामस्करीतून झालेला वादात एकमेकांची डोकी फोडली, नंतर थेट तलावर आणि कुऱ्हाडीने भिडले

Admin

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या खोदकामात सापडला ऐतिहासिक खजिना, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Admin

Uddhav Thackeray: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ निर्देश, आजच नव्या गाइडलाइन्स

Admin

तलवार घेऊन गावात माजवत होता दहशत, पोलिसांनी हिसका दाखवताच…..

Admin

कोल्हापूरमध्ये शिवसेनेत वादळ; यड्रावकर, निवेदिता मानेंच्या विरोधात तक्रारीचे ‘बाण’

Admin

उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा २ ओमिक्रॉन रुग्ण आढळले, धडधड वाढली!

Admin

Leave a Comment