Awaz24x7 News
क्रीडा उडी तंत्रज्ञान देश परदेशी मनोरंजन महाराष्ट्र राज्य व्यवसाय व्हिडिओ साहित्य

उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा २ ओमिक्रॉन रुग्ण आढळले, धडधड वाढली!

उस्मानाबाद : जिल्ह्यात ओमिक्रॉनने शिरकाव केला असून आज कळंब तालुक्यातील मोहा येथील २ रुग्ण ओमिक्रॉन आढळल्याने खळबळ उडाली आहे. कळंब तालुक्यातील मोहा येथील कुटुंब घाना या देशात व्यवसायाच्या निमित्ताने स्थाईक झाले आहे. घाना देशात ओमिक्रॉनने शिरकाव केल्यामुळे घाना देश हा हायरिस्क यादीत गेला होता. ओमिक्रॉनच्या भीतीमुळे सदरील कुटुंब विमानाने घाना देशातुन दिल्लीत आले आणि तिथून पुण्यात आले होते.

दिल्लीत आल्यानंतर सदरील कुटुंबाची चाचणी केल्यानंतर निगेटिव्ह रिपोर्ट आला होता. दिल्ली येथून पुणे मार्गे कळंब तालुक्यातील मोहा येथे सदरील कुटुंब आले होते. १९ डिसेंबर रोजी या कुटुंबातील वडील आणि मुलगा कोरोन् पॉझेटिव्ह आले होते. त्याचे स्वॅबचे नमुने पुणे येथील प्रयोगशाळेत जिनोम टेस्टसाठी देण्यात आले होते. त्याचा रिपोर्ट आज अहवाल प्राप्त झाला असून वडील आणि मुलास ओमिक्रॉनची लागण झाल्याचे निष्पन्न झाले आहे.उस्मानाबाद तालुक्यातील बावी येथील ३ रुग्ण आणि कळंब तालुक्यातील मोहा येथील २ असे एकुण ५ ओमिक्रॉनचे रुग्ण झाले आहेत. मोहा येथील दोन्ही रुग्णांना उस्मानाबाद येथील जिल्हा शासकिय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे.

Related posts

कोल्हापूरमध्ये शिवसेनेत वादळ; यड्रावकर, निवेदिता मानेंच्या विरोधात तक्रारीचे ‘बाण’

Admin

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या खोदकामात सापडला ऐतिहासिक खजिना, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Admin

सोलापूर : ड्रेनेजमध्ये पडल्याने दोघांचा मृत्यू; दोन गंभीर जखमी

Admin

धक्कादायक! पतीच्या खुनाचा पत्नीने केला मोठा खुलासा, पोलिसांना सांगितली थेट आरोपींची नावं

Admin

३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा!

Admin

नागपुरकरांची चिंता वाढली, ओमायक्रॉनचा दुसरा बाधित आढळला

Admin

Leave a Comment