Awaz24x7 News
क्रीडा उडी तंत्रज्ञान देश परदेशी मनोरंजन महाराष्ट्र राज्य व्यवसाय व्हिडिओ साहित्य

‘आम्हाला उल्लू बनवता का?’, मुस्लिम आरक्षणावरुन खासदार इम्तियाज जलील मलिकांवर भडकले

मोसिन शेख, औरंगाबाद : मराठा ओबीसी आरक्षणानंतर आता मुस्लिम आरक्षणाचा (Muslim Reservation) मुद्दा चर्चेत आला आहे. तर मुस्लिम आरक्षणाचा निर्णय घेतला तरी तो पुढे जाऊ शकत नसल्याची माहिती अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी आज विधानसभेत दिली. त्यांच्या याच प्रतिक्रियेवर उत्तर देतांना, आरक्षणावरून मुस्लिमांना उल्लू बनवण्याचं काम सुरू असल्याची खोचक टीका एमआयएम नेते आणि खासदार इम्तियाज जलील (Imtiaz Jaleel) यांनी केली आहे.

एका वृत्तवाहिनीला प्रतिक्रिया देतांना जलील म्हणाले की, नवाब मलिक यांनी विधानसभेत दिलेली माहिती म्हणजे, मुस्लिमांना उल्लू बनवण्याचा धंदा आहे. मलिक म्हणतात पाच टक्के नोकऱ्यांमध्ये आरक्षण देण्याबाबत आम्ही विचार करत असल्याचे म्हणत आहे. पण आमचं म्हणणं आहे की, हायकोर्टाने सांगितल्याप्रमाणे शिक्षणात पाच टक्के आरक्षण देण्यास कोणतीही अडचण नाहीये. त्यामुळे ठाकरे सरकार शिक्षणाबाबतचं आरक्षण का लागू करत नाही?, असा प्रश्न जलील यांनी उपस्थित केला.पुढे बोलताना जलील म्हणाले की, कोर्टाने दिलेला निर्णय हे सरकार लागू करत नाहीये आणि मुस्लिमांना उल्लू बनवण्याचे काम करत आहेत. 2014 मध्ये कोर्टाने मुस्लिमांना शिक्षणात 5 टक्के आरक्षण देण्याचं सांगितले होते. त्यासाठी आणखी किती दिवस लागणार? असा सवाल जलील यांनी केला. सत्तेत असताना सुद्धा जर निर्णय घेत नसाल तर मुस्लिम समाजाला आता सर्व काही कळत असल्याचा टोला जलील यांनी मालिकांना लगावला.

तर मुस्लिम आरक्षणावर मालिकांनी केंद्राकडे बोट दाखवल्याच्या प्रश्नाला उत्तर देतांना जलील म्हणाले, हे पूर्णपणे दिशाभूल करण्याचं काम सुरु आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षातील नेत्यांना असं वाटतं आहे की, मुस्लिमांना काही अक्कल नसून त्यांना काहीच कळत नाही. पण जेव्हा तुम्ही 2014 मध्ये जेव्हा अध्यादेश आणला होतं तेव्हा सुद्धा 50 टक्क्यांची मर्यादेचा नियम होता. तेव्हा कसं शक्य झालं होतं?, असा खोचक सवालही जलील यांनी यावेळी उपस्थित केला.

Related posts

Uddhav Thackeray: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ निर्देश, आजच नव्या गाइडलाइन्स

Admin

नागपुरकरांची चिंता वाढली, ओमायक्रॉनचा दुसरा बाधित आढळला

Admin

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या खोदकामात सापडला ऐतिहासिक खजिना, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Admin

पुण्यात गुन्हेगाराला अटक केल्यानंतर खळबळजनक खुलासा; विमानाने यायचा आणि…

Admin

यवतमाळमधील नवदाम्पत्याला पंतप्रधानांनी पाठवले पत्र; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Admin

थट्टामस्करीतून झालेला वादात एकमेकांची डोकी फोडली, नंतर थेट तलावर आणि कुऱ्हाडीने भिडले

Admin

Leave a Comment