Awaz24x7 News
क्रीडा उडी तंत्रज्ञान देश परदेशी मनोरंजन महाराष्ट्र राज्य व्यवसाय व्हिडिओ साहित्य

पुण्यात गुन्हेगाराला अटक केल्यानंतर खळबळजनक खुलासा; विमानाने यायचा आणि…

हायलाइट्स:विमानाने पुण्यात येऊन घरफोड्यादोन आरोपींना अटकगुन्हे शाखेच्या युनिट चारची कामगिरीपुणे : विमानाने येऊन पुण्यात घरफोड्या करणाऱ्या उत्तर प्रदेशातील दोन सराईत गुन्हेगारांना गुन्हे शाखेच्या युनिट चारने अटक केली आहे. त्यांच्याकडून विश्रांतवाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणत सहा लाख ३७ हजार रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. परवेज शेर मोहम्मद खान (वय ४३) आणि तस्लीम अरिफ समशुल खान (वय २३, रा. दोघेही उत्तर प्रदेश) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. (Pune Crime Latest News Update)परवेज हा सराईत असून त्याच्यावर पुणे व पिंपरी चिंचवड परिसरात नऊ घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत. त्याला यापैकी काही गुन्ह्यात शिक्षा देखील झाली आहे. आरोपी हे विमानाने अथवा कधी-कधी ट्रॅव्हल्सने येऊन घरफोड्या करत होते, अशी माहिती वरिष्ठ निरीक्षक जयंत राजूरकर यांनी दिली.

देशात ओमिक्रॉनच्या उद्रेकाचे संकेत; रुग्णसंख्या थेट ३५५वर; महाराष्ट्रात २४ तासांत…

विश्रांतवाडी परिसरात झालेल्या घरफोडीचा गुन्ह्याचा तपास युनिट चारकडून सुरू होता. त्यामध्ये पोलिसांनी दीडशे ते दोनशे सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यावेळी तो घरफोडीचा गुन्हा रेकॉर्डवरील आरोपी परवेज याने केल्याचं आढळून आलं. त्यानुसार त्याला पकडण्यासाठी पथक दिल्लीला गेले. पण, तो आढळून आला नाही. त्यामुळे पोलिसांनी तेथील खबऱ्यांना तो पुण्याला निघाल्यास माहिती देण्यास सांगितलं. त्यानुसार परवेज हा पुण्याला घरफोडी करण्यासाठी विमानाने निघाला आणि त्याची माहिती युनिट चारला मिळाली. त्यानुसार उपनिरीक्षक जयदीप पाटील यांच्या पथकाने सापळा रचून त्याला व साथीदाराला पकडले. त्याच्याकडे चौकशी केल्यानंतर त्यांच्याकडून दोन घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणले.

‘आम्हाला उल्लू बनवता का?’, मुस्लिम आरक्षणावरुन खासदार इम्तियाज जलील मलिकांवर भडकले

‘असे’ करायचा गुन्हेपरवेज हा पुण्यात पूर्वी विश्रांतवाडी परिसरात राहिला होता. त्यामुळे त्याला त्या परिसराची माहिती होती. त्या भागातच तो घरफोडीचे गुन्हे करायचा. त्यासाठी दिल्लीहून तो विमानाने सकाळी पुण्यात यायचा. त्याचा साथीदार हा पूर्वीच ट्रॅव्हल्सने पुण्यात आलेला असायचा. दोघे एकत्र आल्यानंतर बंद फ्लॅट हेरून घरफोडीचे गुन्हे करायचे. दुपारी चारपर्यंत गुन्हे केल्यानंतर मुद्देमाल साथीदारामार्फत पुन्हा ट्रॅव्हल्सने पाठवायचा आणि तो विमानाने परत जायचा, अशी माहिती पोलीस निरीक्षक जयंत राजूरकर यांनी दिली.

Related posts

यवतमाळमधील नवदाम्पत्याला पंतप्रधानांनी पाठवले पत्र; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Admin

नागपुरकरांची चिंता वाढली, ओमायक्रॉनचा दुसरा बाधित आढळला

Admin

अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायती तातडीने रद्द करा, जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

Admin

धक्कादायक! पतीच्या खुनाचा पत्नीने केला मोठा खुलासा, पोलिसांना सांगितली थेट आरोपींची नावं

Admin

‘आम्हाला उल्लू बनवता का?’, मुस्लिम आरक्षणावरुन खासदार इम्तियाज जलील मलिकांवर भडकले

Admin

उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा २ ओमिक्रॉन रुग्ण आढळले, धडधड वाढली!

Admin

Leave a Comment