Awaz24x7 News
क्रीडा उडी तंत्रज्ञान देश परदेशी मनोरंजन महाराष्ट्र राज्य व्यवसाय व्हिडिओ साहित्य

तलवार घेऊन गावात माजवत होता दहशत, पोलिसांनी हिसका दाखवताच…..

औरंगाबाद : औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी मोठी कारवाई करत तलवारीचा धाक दाखवून दहशत निर्माण करणाऱ्या गुंडाला ताब्यात घेतलं आहे. विशेष म्हणजे या गुंडांची गावात आणि आजूबाजूच्या परिसरात मोठी दहशत होती. पण पोलिसांनी त्याच्या मुसक्या आवळत त्याला चांगलीच अद्दल घडवली असून, त्याच्या ताब्यातून तलवार सुद्धा जप्त करण्यात आली आहे.

बिडकीन पोलीस ठाणे हद्दीत शुभम रमेश साळवे नावाच्या गुंडाने आपली दहशत निर्माण केली होती. अवघ्या १९ वर्षे वयाचा शुभमवर आतापर्यंत ६ पेक्षा जास्त गंभीर गुन्हे दाखल आहेत. गावात आणि परिसरात दहशत असल्याने तो भरदिवसा चोऱ्या करायचा. रस्त्याने जाणाऱ्या महिला आणि शाळकरी मुलींची रस्त्यावर उभा राहून छेड काढायचा. तर काही दिवसांपासून हातात तलवार घेऊन हा आरोपो लोकांमध्ये दहशत निर्माण करत होता.या गुंडाच्या त्रासाला कंटाळून लोकांनी पोलिसांकडे तक्रार केली होती. त्यामुळे बिडकीन पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने आणि त्यांच्या पथकाने या गुंडाच्या मुसक्या आवळल्या आहे. विशेष म्हणजे पोलीस पकडण्यासाठी आल्याचे कळताच हा आरोपी घराच्या छतावर पळाला होता.

पोलिसांनी छतावरून पळत जीव धोक्यात घालून त्याचा पाठलाग करून पकडलं. या आरोपीला न्यायालयात हजर केलं असता त्याला १५ दिवसांची न्यायालयीन पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.

Related posts

कोल्हापूरमध्ये शिवसेनेत वादळ; यड्रावकर, निवेदिता मानेंच्या विरोधात तक्रारीचे ‘बाण’

Admin

थट्टामस्करीतून झालेला वादात एकमेकांची डोकी फोडली, नंतर थेट तलावर आणि कुऱ्हाडीने भिडले

Admin

‘आम्हाला उल्लू बनवता का?’, मुस्लिम आरक्षणावरुन खासदार इम्तियाज जलील मलिकांवर भडकले

Admin

यवतमाळमधील नवदाम्पत्याला पंतप्रधानांनी पाठवले पत्र; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Admin

अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायती तातडीने रद्द करा, जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

Admin

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या खोदकामात सापडला ऐतिहासिक खजिना, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Admin

Leave a Comment