Awaz24x7 News
क्रीडा उडी तंत्रज्ञान देश परदेशी मनोरंजन महाराष्ट्र राज्य व्यवसाय व्हिडिओ साहित्य

सोलापूर : ड्रेनेजमध्ये पडल्याने दोघांचा मृत्यू; दोन गंभीर जखमी

हायलाइट्स:ड्रेनेजमध्ये पडून दोघांचा जागीच मृत्यू अन्य दोघे गंभीर जखमीजखमींवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरूसोलापूर : अक्कलकोट रस्त्यावरील सादुल पेट्रोल पंपासमोर सुरू असलेल्या रस्ते कामातील ड्रेनेजमध्ये पडून दोघांचा जागीच मृत्यू झाला असून अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.सोलापूर अक्कलकोट या रस्त्याचं काम सध्या सुरू आहे. या चार पदरी रस्त्यामुळे अगोदरच ड्रेनेजची कामे केली जात आहेत, मात्र हे काम करताना कोणतीही खबरदारी संबंधित ठेकेदाराने अथवा महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने घेतली नसल्याने सदरची घटना घडल्याचा आरोप करण्यात येत आहे. रस्त्याला लागून असल्याने आणि त्यावर कसल्याही प्रकारचं झाकण नसल्याने हे ड्रेनेज धोकादायक अवस्थेत होते. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी या ड्रेनेजमध्ये चार जण पडले.

देशात ओमिक्रॉनच्या उद्रेकाचे संकेत; रुग्णसंख्या थेट ३५५वर; महाराष्ट्रात २४ तासांत…

दरम्यान, या दुर्घटनेनंतर आजुबाजूच्या नागरिकांनी ड्रेनेजमध्ये पडलेल्या चार जणांना वाचवण्याचा प्रयत्न केला. शर्थीचे प्रयत्न करून दोघांना सुखरूप बाहेर काढण्यात आलं. मात्र सध्या त्यांची परिस्थिती गंभीर आहे, तर इतर दोघांना आपला जीव गमवावा लागला आहे.

Related posts

वीजबिल थकलेल्यांसाठी महावितरणाचा मोठा निर्णय, १८ लाख ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी

Admin

अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायती तातडीने रद्द करा, जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

Admin

थट्टामस्करीतून झालेला वादात एकमेकांची डोकी फोडली, नंतर थेट तलावर आणि कुऱ्हाडीने भिडले

Admin

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या खोदकामात सापडला ऐतिहासिक खजिना, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Admin

उस्मानाबाद जिल्ह्यात पुन्हा २ ओमिक्रॉन रुग्ण आढळले, धडधड वाढली!

Admin

यवतमाळमधील नवदाम्पत्याला पंतप्रधानांनी पाठवले पत्र; कारण ऐकून तुम्हीही व्हाल थक्क

Admin

Leave a Comment