Awaz24x7 News
क्रीडा उडी तंत्रज्ञान देश परदेशी मनोरंजन महाराष्ट्र राज्य व्यवसाय व्हिडिओ साहित्य

Uddhav Thackeray: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ निर्देश, आजच नव्या गाइडलाइन्स

हायलाइट्स:महाराष्ट्रात पुन्हा एकदा निर्बंध लावण्याचा निर्णय.गर्दी रोखण्यावर सर्वाधिक भर देण्याची सूचना.मुख्यमंत्र्यांच्या निर्देशाने आज नव्या गाइडलाइन्स.मुंबई: ओमिक्रॉन व्हेरिएंटचा वाढता धोका लक्षात घेत केंद्र सरकारने सर्व राज्यांना सतर्क केले असतानाच गुरुवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्स तसेच प्रमुख वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक घेतली. या बैठकीत ओमिक्रॉनची सद्यस्थिती लक्षात घेत व्यापक चर्चा करण्यात आली. त्याचवेळी गर्दी कमी करण्यासाठी कोणत्या प्रकारचे निर्बंध लावता येतील, राज्यात नाइट कर्फ्यू लावण्याची गरज आहे का, ओमिक्रॉनला रोखण्यासाठी अन्य कोणत्या उपाययोजना कराव्या लागतील, अशा अनेक मुद्द्यांवर मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची मते जाणून घेतल्याचे सांगण्यात येत आहे. मुख्य म्हणजे शुक्रवारीच राज्यात नव्याने गाइडलाइन्स जारी करण्याचे निर्देश या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत. ( Maharashtra New Guidelines Latest News )वाचा: ओमिक्रॉनला रोखण्यासाठी वेगवान पावले; PM मोदींनी दिला पहिला अलर्ट!

ओमिक्रॉन व्हेरिएंटला रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात याव्यात. त्यात नाइट कर्फ्यू तसेच स्थानिक पातळीवर गर्दी टाळण्यासाठी निर्बंध लावले जावेत, अशाप्रकारचे निर्देश केंद्र सरकारने राज्यांना दिले आहेत. त्यानंतर मध्य प्रदेश सरकारने लगेचच निर्णय घेत राज्यात नाइट कर्फ्यू लावला आहे. त्यापाठोपाठ गुरुवारी रात्री १० वाजता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोविड टास्क फोर्ससोबत तातडीची बैठक घेतली. या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. देशातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या साडेतीनशेच्या वर गेली आहे. त्यात महाराष्ट्रात सर्वाधिक ८८ रुग्ण आढळले आहेत. त्याने महाराष्ट्राचं टेन्शन वाढलं असून याबाबत तपशीलवार माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. देशातील अन्य राज्यांमधील स्थिती, तेथे लावण्यात आलेले निर्बंध याबाबतचा तपशीलही मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतला. यूरोपमधील ब्रिटन व अन्य देशांत कोविड स्थिती भीषण आहे. अमेरिकेतही रुग्णसंख्येचा उद्रेक झाला आहे. या सर्व बाबी लक्षात घेता महाराष्ट्रात कोणती पावले उचलली जावीत, याबाबत मुख्यमंत्र्यांनी टास्क फोर्सची मतेही विचारात घेतली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाच्या सूचना केल्या असून बैठकीत अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

वाचा:देशात ओमिक्रॉनच्या उद्रेकाचे संकेत; रुग्णसंख्या ३५५वर; महाराष्ट्रात २४ तासांत…

नाताळ सण, नववर्षाचे सेलिब्रेशन या गोष्टी लक्षात घेता कमीतकमी गर्दी कशी होईल तसेच विवाह समारंभ, पार्ट्या या अनुषंगाने हॉटेल्स आणि उपाहारगृहात होणाऱ्या गर्दीवर कसे निर्बंध लावता येतील यादृष्टीने बैठकीत विस्तृत चर्चा करण्यात आली व याबाबत शुक्रवारी (२४ डिसेंबर) नवी नियमावली जाहीर करण्याचे ठरले. दूरदृश्य प्रणालीद्वारे झालेल्या या बैठकीत मुख्य सचिव देवशीष चक्रवर्ती, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार सीताराम कुंटे, मुख्यमंत्र्यांचे अतिरिक्त मुख्य सचिव आशिष कुमार सिंह, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार डॉ. दीपक म्हैसेकर, मुंबई पालिका आयुक्त इक्बालसिंह चहल, वैद्यकीय शिक्षण सचिव सौरभ विजय, टास्क फोर्सचे डॉ. संजय ओक, डॉ. शशांक जोशी, डॉ. अजित देसाई, डॉ. राहुल पंडित आदींनी बैठकीत सहभाग घेतला व सूचना केल्या.

वाचा:ओमिक्रॉनमुळे निवडणुका लांबणीवर?; हायकोर्टाने मोदींना केली ‘ही’ विनंती

Related posts

सोलापूर : ड्रेनेजमध्ये पडल्याने दोघांचा मृत्यू; दोन गंभीर जखमी

Admin

३ वर्षीय मुलीवर अत्याचार करून माणुसकीला काळीमा फासणाऱ्या आरोपीला जन्मठेपेची शिक्षा!

Admin

बाळासाहेबांच्या स्मारकाच्या खोदकामात सापडला ऐतिहासिक खजिना, उद्धव ठाकरेंनी व्यक्त केली ‘ही’ इच्छा

Admin

धक्कादायक! पतीच्या खुनाचा पत्नीने केला मोठा खुलासा, पोलिसांना सांगितली थेट आरोपींची नावं

Admin

नागपुरकरांची चिंता वाढली, ओमायक्रॉनचा दुसरा बाधित आढळला

Admin

पुण्यात गुन्हेगाराला अटक केल्यानंतर खळबळजनक खुलासा; विमानाने यायचा आणि…

Admin

Leave a Comment