Awaz24x7 News
क्रीडा उडी तंत्रज्ञान देश परदेशी मनोरंजन महाराष्ट्र राज्य व्यवसाय व्हिडिओ साहित्य

थट्टामस्करीतून झालेला वादात एकमेकांची डोकी फोडली, नंतर थेट तलावर आणि कुऱ्हाडीने भिडले

औरंगाबाद : पैठण शहरात गुरुवारी रात्री दोन गटात झालेल्या तुंबळ हाणामारीत सहाजण जखमी झाले असून, दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना औरंगाबाद घाटी रुग्णालयात हलविण्यात आले आहे. थट्टामस्करीतून झालेला वाद एवढ्या टोकाला गेला की थेट दोन गट आपापसात भिडल्याचे पाहायला मिळाले.

मिळालेल्या माहितीनुसार, पैठण-येथील नेहरु चौक भागातील खाटकांच्या दोन गटात किरकोळ कारणावरून जोरदार हाणामारी झाली असून यात दोघांचे डोके फुटले आहे. तर चारजण किरकोळ जखमी झाले आहेत. वेळीच पोलीस घटनास्थळी दाखल झाल्याने तसेच स्थानिक रहिवाशांनी दोन्ही गटाच्या लोकांना आवरल्याने पुढील अनर्थ टळला. मात्र, या हाणामारीत सहाजण जखमी झाले असून, दोन जण गंभीर जखमी आहेत.वीजबिल थकलेल्यांसाठी महावितरणाचा मोठा निर्णय, १८ लाख ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमीपैठण शहरातील नेहरू चौक भागातील खाटिक समाज मोठ्या प्रमाणात वास्तव्यास आहे. दुपारी ३:३० वाजेच्या सुमारास किरकोळ कारणावरून वाद निर्माण होऊन दोन गट आमने सामने आले. पाहता-पाहता दोन्ही गट लाठ्या-काठ्या घेऊन एकमेकांवर तुटून पडले. ज्यात दोन्ही गटातील लोकं जखमी झाले. तर पैठण पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत जमाव पांगवत हाणामारी करणाऱ्यांना ताब्यात घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. या प्रकरणी पैठण पोलीस ठाण्यात दोन्ही गटातील १४ लोकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

धक्कादायक! पतीच्या खुनाचा पत्नीने केला मोठा खुलासा, पोलिसांना सांगितली थेट आरोपींची नावं

Related posts

अनुसूचित क्षेत्रातील नगरपंचायती तातडीने रद्द करा, जयंत पाटील यांची विधानपरिषदेत मागणी

Admin

नागपुरकरांची चिंता वाढली, ओमायक्रॉनचा दुसरा बाधित आढळला

Admin

Uddhav Thackeray: महाराष्ट्रात पुन्हा निर्बंध; CM ठाकरेंनी दिले ‘हे’ निर्देश, आजच नव्या गाइडलाइन्स

Admin

धक्कादायक! पतीच्या खुनाचा पत्नीने केला मोठा खुलासा, पोलिसांना सांगितली थेट आरोपींची नावं

Admin

कोल्हापूरमध्ये शिवसेनेत वादळ; यड्रावकर, निवेदिता मानेंच्या विरोधात तक्रारीचे ‘बाण’

Admin

सोलापूर : ड्रेनेजमध्ये पडल्याने दोघांचा मृत्यू; दोन गंभीर जखमी

Admin

Leave a Comment